Last Updated: Monday, July 16, 2012, 14:22
www.24taas.com, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची तब्बल साडेतीन वर्षांनंतर भेट झाली. निमित्त होते उद्धव यांच्या आजाराचे.
छातीत दुखू लागल्यानं उद्धव ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. राज यांनी रक्ताचे नाते जपत आपला नियोजित दौरा अर्धवट टाकून मुंबई गाठली आणि ते थेट लिलावती रूग्णालयात धाव घेतली. त्याठिकाणी उद्धव यांची विचारपूस केली.
उद्धव ठाकरे यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. छातीत दुखू लागल्यानं त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. शिवसेनेचे नेतेही आता लिलावती रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. रूग्णालयाच्या बाहेर कार्यकर्ते जमल्याने गर्दी झाली आहे. तर राज ठाकरे हे देखिल अलिबागचा दौरा अर्धवट सोडून उद्धव यांच्या भेटीसाठी आलेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यवर अॅंजिंओग्राफी करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिलीय. उद्धव ठाकरेंना आज डिश्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचंही रावते यांनी सांगितलय. उद्धव यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहा..
First Published: Monday, July 16, 2012, 14:22