माल वाहतूकदार संपावर... - Marathi News 24taas.com

माल वाहतूकदार संपावर...

www.24taas.com, मुंबई
 
माल वाहतूकदारांनी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारलाय. माल वाहतूक गाड्यांसहीत शालेय बसेस आणि सर्व अवजड वाहनांना वेग नियंत्रक लावण्याच्या निर्णयाविरोधात मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय माल वाहतूकदार संघटनेनं घेतलाय.
 
वेगनियंत्रक लावण्याची सुरुवात १ जूनपासून झालीय. १ जुलै २०१३ पर्यंत वेग नियंत्रक अनिवार्य करण्यात येणार आहे. अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळं अपघातांची संख्या वाढलीय.  त्यामुळं वाहनांना वेगनियंत्रक लावण्याचा निर्णय सरकारनं जानेवारीत घेतला. त्यानुसार शालेय बसेसना १ जूनपासून तर डंपर, टँकर, आणि टिपर तर १ नोव्हेंबरपासून खासगी वाहने आणि एसटीच्या गाड्या वगळता सर्व वाहनांना वेग नियंत्रक लावले जाणार आहेत. त्याला माल वाहतूकदारांच्या संघटनेचा विरोध आहे.
.

First Published: Tuesday, July 17, 2012, 10:45


comments powered by Disqus