Last Updated: Thursday, December 15, 2011, 05:39

झी २४ तास वेब टीम, मुंबई
डॉलरला मागणी वाढल्याने रूपयाची घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातील ही दुसरी मोठी घट आहे. रुपयाच्या मूल्यातील विक्रमी घसरण गुरुवारीही कायम राहिली.
डॉलरला मागणी वाढल्याने या चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५४.१६ च्या पातळीवर गेले. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची आणखी घसरण झाली आहे. एका डॉलरची किंमत ५४ रुपये २२ पैसे इतकी झाली आहे.
आज बाजार उघडताच रुपयाचे अवमूल्यन होण्यास सुरुवात झाली आणि रुपयाने आतापर्यंतचा निचांक नोंदवला. औद्योगिक वृद्धी खाली घसरल्याने विदेशी संस्थांनी बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी घेतला असल्याने याचा परिणाम रुपयावर झाली आहे आणि रुपयाची मोठी घसरण झाली आहे.
First Published: Thursday, December 15, 2011, 05:39