आबांनी केला जकात चोरीचा खुलासा - Marathi News 24taas.com

आबांनी केला जकात चोरीचा खुलासा

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महापालिकेत दररोज कोट्यवधींची जकात चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जकातचोरीचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलीय.
 
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची तयारीही गृहमंत्र्यांनी दर्शवलीय. एसीबीनं कारवाई करायला सुरुवात केल्यापासून दर दिवशी एक ते सव्वा कोटी रुपयांनी जकातीचे उत्पन्न वाढल्याची माहितीही पाटील यांनी दिलीय. याचाच अर्थ रोज कोट्यवधी रुपयांची जकात चोरी होत असल्याची शक्यता आहे. अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांचं रॅकेट कार्यरत असल्याचा खुलासाही गृहमंत्र्यांनी यावेळी केलाय. जकात चोरीसंबंधी कठोर पाऊल उचलून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
 
 
.
 

First Published: Tuesday, July 17, 2012, 13:21


comments powered by Disqus