मैला वाहून नेणा-या प्रथेला आता बंदी - Marathi News 24taas.com

मैला वाहून नेणा-या प्रथेला आता बंदी

www.24taas.com, मुंबई
 
मैला वाहून नेणा-या प्रथेला विधिमंडळात विरोध करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रथेचा निषेध केला.यावेळी ही प्रथा दोन महिन्या बंद करण्यात येईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
 
कायदा असून अंमलबजावणी होत नाही, अशी तक्रार आमदारांनी केली. विशेष म्हणजे मेहतर समाजाच्या या समस्येविषयी झी २४ तासनं वृत्त दिलं होतं. त्याचा उल्लेख करुन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी 'झी २४ तास'चे आभार मानले.
 
ही समस्या म्हणजे राज्यावर कलंक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. मैला वाहून नेण्याविरोधात कायदा असूनही त्याची अमलबजावणी होत नाही.दोन महिन्यांत ही लाजीरवाणी प्रथा बंद करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले. झी २४ तासने आवाज उठविल्याने महाराष्ट्रातील या अनिष्ट प्रथेला आळा बसणार आहे.

First Published: Tuesday, July 17, 2012, 17:29


comments powered by Disqus