भुजबळांचा अजब खर्चाचा, गजब दावा - Marathi News 24taas.com

भुजबळांचा अजब खर्चाचा, गजब दावा

www.24taas.com, मुंबई
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे आता विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. तर भुजबळांनी बांधकाम पूर्ण व्हायला दोन वर्ष जास्त लागली असली तरी सरकारचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा केलाय.
 
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. भुजबळांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आलीय. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाची किंमत ५२ कोटींवरून १५२ कोटींवर गेली असून सर्व कामं भुजबळांच्या कंपनीला दिल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय.
 
पण, यामुळे सरकारचं मात्र काहीही नुकसान झालेलं नाही, असा दावा भुजबळांनी केलाय. दोन वर्ष अधिक गेली असली तरी महाराष्ट्र सदनाचं काम जवळजवळ पूर्ण झाल्याचं भुजबळ म्हणतायत. या प्रकरणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपनं भुजबळांच्याविरोधात घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे आगामी काळात राज्यात नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे, हे नक्की.
 
.

First Published: Wednesday, July 18, 2012, 09:07


comments powered by Disqus