डिम्पलचा हात शेवटपर्यंत सोडला नाही... - Marathi News 24taas.com

डिम्पलचा हात शेवटपर्यंत सोडला नाही...

www.24taas.com, मुंबई
 
पुष्पा... रो मत, आय हेट टियर्स असं म्हणत ज्याने करोडो चाहत्यांना ज्याने भुरळ घातली. त्या सुपरस्टार राजेश खन्ना यांनी साऱ्यांनाच रडायला लावलं. शेवटच्या क्षणी डिम्पलचा हात त्यांच्या हातात घेतला होता. आणि पत्नी डिम्पलसमोरच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सुपरस्टार राजेश खन्ना यांची अदा आणि नखरे त्यांच्या चाहत्यांनी प्रेमळपणे स्वीकारले. दृष्ट लागावी अशी अफाट लोकप्रियता त्यांना मिळाली. म्हणूनच की काय त्यांच्या कारकीर्दीला आणि व्यक्तिगत आयुष्याला जणू दृष्टच लागली.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून राजेश खन्ना यकृताच्या विकाराने आजारी होते. दोन महिन्यांत त्यांना चार वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांनी अन्न-पाणी सोडले. ते केवळ फळांच्याच रसावर होते. १५ दिवसांत त्यांचे वजन तब्बल नऊ किलोंनी घटले होते. शनिवारी त्यांना सायंकाळी तातडीने लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्जही मिळाला, परंतु त्यांची प्रकृती ढासळत गेली.
 
ते कोणत्याही औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते. आज सकाळपासून त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी सर्व आशा सोडल्या होत्या. अखेरच्या क्षणी मुलगी रिंकी आणि  टिवि्ंकल आणि जावई अक्षयकुमार यावेळी उपस्थित होते.
 
 
 

First Published: Thursday, July 19, 2012, 08:17


comments powered by Disqus