'टाईम हो गया है... पॅक अप!' - Marathi News 24taas.com

'टाईम हो गया है... पॅक अप!'

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूडचा पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला तेव्हाचे शेवटचे शब्द साऱ्यांच्या मनात कालवा करून गेले. 'टाईम हो गया है... पॅक अप'. बॉलिवूडचे काका यांच्या आठवणीत भावूक झालेले बीग बी अमिताभ बच्चन यांनी बुधवारी रात्री ट्विटरवर ही गोष्ट ट्विट केली.
 
अमिताभने हे ही सांगितले की, त्यांच्या घरातील लोकांनी मला सकाळी सांगितले की, राजेश खन्ना यांचे शेवटचे शब्द असे होते... 'टाईम हो गया है... पॅक अप!' अमिताभ यांनी असेही लिहले आहे की, मी त्यांच्या निष्प्राण शरीराजवळ फक्त नि:शब्द उभा होतो.
 
माझी विचारशक्ती पुर्णपणे खुंटली होती. राजेश आम्हांला सोडून गेलाय ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. सुपरस्टार हा शब्द त्याच्यासाठीच शोधण्यात आला होता. आणि माझ्यासाठी तो शब्द नेहमी त्याच्यासाठीच राहील असेही अमिताभ यांनी म्हटलंय
 
 
 

First Published: Thursday, July 19, 2012, 12:07


comments powered by Disqus