काकांच्या अंत्ययात्रेला गालबोट, चाहत्यांवर लाठीहल्ला - Marathi News 24taas.com

काकांच्या अंत्ययात्रेला गालबोट, चाहत्यांवर लाठीहल्ला

www.24taas.com, मुंबई
 
आपल्या आवडत्या सुपरस्टार काकांची शेवटची झलक पाहता यावी यासाठी लाखो चाहते आज त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले होते. तर विलेपार्लेतल्या स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेते आल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या गाडीवर लोकांची एकच गर्दी लोटली होती. आणि त्यामुळेच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
 
राजेश खन्ना यांच्या अंतयात्रेत अनेक अभिनेते दाखल झाल्याने त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला. आणि त्यामुळे पोलिसांनी गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीची वाढती हुल्लडबाजी यामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला.
 
बॉलिवूडच्या सुपरस्टार राजेश खन्नांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेलेल्या चाहत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. हजारोंची गर्दी पोलिसांना अजिबात आवरता आली नाही. गर्दीला पांगवण्यासाठीच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
 
 
 

First Published: Thursday, July 19, 2012, 13:52


comments powered by Disqus