Last Updated: Thursday, December 15, 2011, 12:56
झी २४ तास वेब टीम, मुंबई शिवसेनेत पुर्नदाखल झालेले जयवंत परब यांच्या समर्थक नगरसेविका जोत्स्ना दिघेंनी कॉंग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतलायं. जोत्स्ना दिघे दहा वर्ष मुंबई महापालिकेत वॉर्ड क्रमाक ६० च्या नगरसेविका आहेत.जोत्सना दिघेच्या पालिकेतील कामकाजाच्या प्रगतीपुस्तकाचा घेतलेला हा आढावा.
मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्रमाक ६० च्या नगरसेविका जोत्स्ना दिघेनी गेली दहा वर्ष नगरसेविका आहेत. जोत्स्ना दिघेंना ‘प्रजा फाऊन्डेशन’ या संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात दहावा क्रमांक मिळालाय.पालिकेतील २२७ नगरसेवकांची सभागृहातील उपस्थिती,वॉर्डातील विकासकाम पूर्तता,त्या नगरसेवकांची गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणीत ‘प्रजा फाऊन्डेशन’ने जोत्स्ना दिघेना १०० पैकी ७६ मार्क दिले आहेत.पालिकेतील कामकाजाच्या या प्रगतीपुस्तकामुळे जोत्स्ना दिघेंचा आत्मविश्वास बळावलाय. या आत्मविश्वासामुळे त्यांनी त्यांचे राजकिय गुरू जयवंत परबांनी शिवसेनेत प्रवेश केला तरी मतदार मलाच मतदान करतील असा दावा जोत्स्ना दिघेंनी केलाय.
काँग्रेस नगरसेविका जोत्सना दिघे यांच्या कार्याला स्थानिक रहिवांशी आणि NGO नी ७ पैकी ७ मार्क दिले आहेत.
राजकिय गुरू जयवंत परबाना आव्हान देत जोत्स्ना दिघेंनी मतदारापुढे विकासकामावरच मत मागण्याचा निर्णय घेतलाय.विकासकामाच्या प्रगतीपुस्तकावरच जनता मला पुन्हा निवडून आणेल असा दावा जोत्स्ना दिघेंनी केलाय.
First Published: Thursday, December 15, 2011, 12:56