राजची उद्धववर माया किती, पोहचले पुन्हा लीलावती - Marathi News 24taas.com

राजची उद्धववर माया किती, पोहचले पुन्हा लीलावती

www.24taas.com, मुंबई
 
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे थोड्याच वेळापूर्वी लीलावती हॉस्पिचलमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यावर आज अँजिओप्लास्टी होणार आहे. अँजिओप्लास्टीवेळी त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहणार आहेत.
 
उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून छातीत दुखत असल्याने त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. मात्र आता त्यांची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आणि त्यामुळेच घरातील कोणीतरी व्यक्ती त्यांच्याजवळ असावी ही बाळासाहेबांची इच्छा होती. आणि बाळासाहेबांच्या इच्छेनुसार राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
 
आज उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टीवेळी राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. विख्यात तज्ज्ञांमार्फत अँजिओप्लास्टीवेळी करण्यात येणार असल्याचे समजते. राज ठाकरे गेले अनेक दिवस उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत. तर राज ठाकरेंची आईदेखील लीलावतीत उपस्थित राहणार आहेत. अँजिओप्लास्टीआधी २ तास प्राथमिक चाचण्या करण्यात येणार आहेत.
 
 
 

First Published: Friday, July 20, 2012, 10:49


comments powered by Disqus