जिंदाल मुंबई पोलिसांच्या तावडीत - Marathi News 24taas.com

जिंदाल मुंबई पोलिसांच्या तावडीत

www.24taas.com, मुंबई
 
२६/११च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार दहशतवादी अबू जिंदाल याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबईच्या क्राईम ब्रँच टीमनं अबूला आज मुंबईच्या किला कोर्टात हजर केलं होतं. ३१ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
 
मुंबई हल्ल्यात अबू जिंदालनं महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. सध्या अटकेत असलेला दहशतवादी कसाबनंही हल्ल्यादरम्यान अबूकडून सूचना मिळत असल्याची माहिती दिली होती. दिल्ली पोलिसांनी अबूला पकडल्यावर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं. या सर्व घडामोडींबाबत एटीएसचे प्रमुख राकेश मारीया यांनी क्राईम ब्रँचचे प्रमुख हिमांशू रॉय यांच्याशी चर्चा केली.
 
.

First Published: Saturday, July 21, 2012, 16:14


comments powered by Disqus