Last Updated: Monday, July 23, 2012, 14:07
www.24taas.com, मुंबई शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्धव यांची तब्बेत बिघडल्याचे समजतात चुलत भाऊ राज ठाकरे मदतीला धाऊन आले होते.
मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. तत्पूर्वी याच हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओग्राफी झाली होती. त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करुन घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, गेल्या चार दिवसात मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या अनेक नेत्यांनी तसेच उद्योगपती, कलाकारांनी उद्धव यांची भेट घेऊन प्रकृतिची विचारपूस केली.
उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत आता वेगाने सुधारणा होत असल्याचे डॉ. जलील परकार यांनी सांगितले. उद्धव यांच्यावर यशस्वीरीत्या ऍन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातच विश्रांती घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ते शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयात ठेवण्यात आले होते.
First Published: Monday, July 23, 2012, 14:07