मुंबईकरांसाठी १५० रुपयांची ‘बेस्ट’ योजना - Marathi News 24taas.com

मुंबईकरांसाठी १५० रुपयांची ‘बेस्ट’ योजना

www.24taas.com, मुंबई 
 
मुंबईकरांना आता केवळ १५० रुपयांच्या दैनंदिन पासात साधारण, जलदसोबतच वातानुकूलित बसमधूनही प्रवास करता येणार आहे. हा पास केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहिल. सध्या बेस्टचा दैनंदिन पास ४० रुपयांचा आहे. पण, या योजनेत बऱ्याच त्रुटी असल्याचं अनेक सदस्यांनी म्हटलंय.
 
वातानुकूलित वातानुकूलित बसमधून १५० रुपयांत प्रवास करण्याच्या दैनंदिन पास योजनेला मंगळवारी बेस्ट समितीनं मंजुरी देलीय. येत्या ७ ऑगस्ट रोजी बेस्ट दिन साजरा करण्यात येणार आहे. याच दिवसापासून या योजनेलाही प्रारंभ करण्यात येईल. यासाठी प्रवाशांना बेस्टचं आरएफआयडी कार्ड घ्यावं लागणार आहे.
 
मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष केंद्रीत करून बेस्ट प्रशासनानंच हा प्रस्ताव समितीसमोर मांडला होता. या १५० रुपयांच्या एका दिवसाच्या पासामध्ये प्रवाशांना मुंबईपासून ठाणे, भाईंदर आणि कळंबोलीपर्यंत प्रवास करता येईल.
 
.

First Published: Wednesday, July 25, 2012, 10:18


comments powered by Disqus