'अनुदान नको; हवीय फक्त मान्यता' - Marathi News 24taas.com

'अनुदान नको; हवीय फक्त मान्यता'

www.24taas.com, मुंबई
 
राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समिती आझाद मैदानात दुपारी दोन वाजता आंदोलन करणार आहे.
 
२००५ पासून तब्बल १०० मराठी माध्यामाच्या शाळा मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. अनुदान नको, कोणतीही मदत नको, केवळ मान्यता द्या अशी मागणी असूनही या शाळांकडे सरकारने दुर्लक्ष केलय. या शाळांमध्ये १२ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत आणि या सर्व शाळा सध्या चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र, एकीकडे इंग्रजी शाळांबाबत उदार धोरण राबवताना मराठी शाळांना सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा या संघटनांचा आरोप आहे. माराठी शाळांच्या मन्यतेसाठी २०११ मध्ये केलेल्या उपोषणावेळी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अधिकाधिक शाळांना मान्यता देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकारने आश्वासन पाळलं नाही. याविरोधात हे आंदोलन करण्यात येतय.

First Published: Wednesday, July 25, 2012, 14:37


comments powered by Disqus