Last Updated: Wednesday, July 25, 2012, 13:42
www.24taas.com, मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिलावती हॉस्पिटलला जाऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतलीय. बाळासाहेब ठाकरेंना श्वसनाचा त्रास होत असल्यानं कालपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून मंगळवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनाप्रमुखांना हॉस्पिटलमद्ये भरती करावं लागलंय. बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्यानं त्यांच्या काही महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे यांनी आज लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या काकांची भेट घेतलीय.
.
First Published: Wednesday, July 25, 2012, 13:42