Last Updated: Sunday, July 29, 2012, 21:47
www.24taas.com, मुंबई मुख्यमंत्री फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामे करतात. त्यांनी कितीही कामे केल्याचा दावा केला, तरी समन्वय समितीच्या बैठकीत सर्व काही समोर येईल, असंही पिचड म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री कामे करत नाहीत, अशा असंख्य तक्रारी आल्याचंही पिचडांनी म्हटलंय. राज्य चालवताना गतीने कामं होण्याची गरज आहे, अजितदादांची ट्रेन फास्ट आहे, त्यामुळे आम्हाला फटाफट कामं करायची सवय आहे, अशी अजितदादांची बाजूही त्यांनी घेतली.
हे सांगतानाच एवढं होऊनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती कायम राहील, असं सांगायलाही पिचड विसरले नाहीत. युती कायमची राहील, मात्र समन्वय हवा, असा आधीचाच सूर पुन्हा एकदा त्यांनी लावला. आता यावर मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडेच सर्वाचं लक्ष लागलंय.
First Published: Sunday, July 29, 2012, 21:47