राष्ट्रवादीला माणिकराव ठाकरेंचे उत्तर - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीला माणिकराव ठाकरेंचे उत्तर

www.24taas.com, मुंबई
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तशाच शब्दांत उत्तर दिले.
 
मुख्य़मंत्री राष्ट्रवादीच्या वैयक्तिक हिताच्या आड येत असतील म्हणून पिचड यांनी टीका केली असावी असा टोला माणिकरावांनी हाणला. तर राष्ट्रवादीचे निवडून आलेले अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री विधानसभा आणि लोकसभेत काय प्रभाव दाखवतायत असा चिमटाही त्यांनी पवार काका-पुतण्यांना काढला.
 
आणखी संबंधित बातम्या
 
पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी

पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.


----------------------------------------



मुख्यमंत्री करतात फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामं!

मुख्यमंत्री करतात फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामं!
मुख्यमंत्री फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामे करतात. त्यांनी कितीही कामे केल्याचा दावा केला, तरी समन्वय समितीच्या बैठकीत सर्व काही समोर येईल, असंही पिचड म्हणाले आहेत.

.

----------------------------------------








पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राज्यातलं सरकार दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळं एकतर्फी निर्णय चालणार नाही अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले आहे. मुख्यमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही नसल्याचं सांगत काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.







First Published: Monday, July 30, 2012, 20:41


comments powered by Disqus