Last Updated: Monday, July 30, 2012, 20:35
www.24taas.com, मुंबई शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. कालही उद्धव यांनी लीलावतीत जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
बाळासाहेबांना श्वसनाच्या त्रासामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आणखी तीन दिवस लीलावती रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले.
श्वसनाचा त्रास होत असल्याने बाळासाहेब ठाकरे यांना २४ जुलै रोजी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळासाहेबांना अतिदक्षता विभागातून सामान्य रुममध्ये हलविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
First Published: Monday, July 30, 2012, 20:35