Last Updated: Tuesday, July 31, 2012, 21:09
www.24taas.com, मुंबई नेहरू-गांधी घराण्यासमोर लाळ घोटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची कमी नाही आहे. सोनिया गांधी यांना खूप करण्यासाठी काँग्रेसचे काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी आज कहरच केला. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेताना संजय दत्त यांनी जय हिंद, जय महाराष्ट्रबरोबर जय सोनियाचा नारा दिला.
आमदार संजय दत्त यांच्या या शपथ घेतल्यानंतर सर्वच आश्चर्य चकित झालेत. जय हिंद, जय महाराष्ट्राच्या नामावलीत सोनियांचं नाव घेऊन आमदार संजय दत्त यांनी लाळघोटे पणाचा कहर केला.
संजय दत्त यांनी गेल्यावर्षी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी, आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा त्याग केला होता. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना पुन्हा विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं.
आता त्यांनी हायकमांडचं कौतुक करण्यासाठी थेट जय सोनियांचा नारा दिला आहे. त्यांच्या या लाळघोटेपणावर सर्वच थरातून टीका होत आहे. याच शपथविधीच्या कार्यक्रमात शिवसेना आमदार विनायक राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करुन शपथ घेतली.
First Published: Tuesday, July 31, 2012, 21:09