Last Updated: Sunday, December 18, 2011, 05:48
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:१३ ते दुपारी ३: ४८ या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार . त्यामुळे अप धीमा गतीच्या मार्गावरील ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरील सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यानही सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि अंधेरी स्थानकांदरम्यानही सकाळी ११ ते दुपार ४ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान हार्बर मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसच चर्चगेट आणि अंधेरी दरम्यानच्या अप तसच स्लो मार्गांवरील काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
- मध्यरेल्वे
* मध्यरेल्वे वर आज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे. पर्यंत मेगाब्लॉक, कल्याण ते ठाणे दरम्यान असणार मेगाब्लॉक, अप स्लो मार्गावरील सेमी फास्ट गाड्या कल्याण ते मुंलूड दरम्यान फास्ट ट्रॅकवर धावणार. - पश्चिम रेल्वे* पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, अंधेरी - सीएसटी व अंधेरी चर्चगेच रेल्वे वाहतूक बंद, दु. ४ वाजेपर्यंत माहीम ते अंधेरी दरम्यान मेगाब्लॉक. - हार्बर रेल्वे* हार्बर अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक, हार्बर - सीएसटी - वांद्रे - अंधेरी वाहतूक बंद, सीएसटी - पनवेल डाऊन मार्ग सकाळी १०.३० ते दुपारी ३:३५ पर्यंत मेगाब्लॉक.
First Published: Sunday, December 18, 2011, 05:48