Last Updated: Sunday, August 5, 2012, 18:18
www.24taas.com, मुंबईसिने अभिनेता आणि प्रोड्युसर अरमान कोहलीनं छेडछाड केल्याची तक्रार एका मॉडेलनं मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नोंदवलीय.
दया पंडित असं या मॉडेलचं नाव आहे. तिच्या म्हणण्यानुसार अभिनेता प्रोड्युसर अरमान कोहलीनं सिनेमात काम देण्याच्या बहाण्यानं तिला घरी बोलावलं आणि तिथं तिची छेड काढण्य़ाचा प्रयत्न केला. मुख्य बाब म्हणजे, ज्यावेळी दया पंडित तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती, तेव्हा ती नशेत होती. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन अरमानच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवाय दया पंडित हिचीही वैद्यकीय चाचणी केली. या चाचणीत दया पंडित नशेत असल्याचं स्पष्ट झालंय.
First Published: Sunday, August 5, 2012, 18:18