सेनेचा राडा, डॉक्टरला मारहाण - Marathi News 24taas.com

सेनेचा राडा, डॉक्टरला मारहाण

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात शिवसैनिकांन गोंधळ घातला आहे. कामगार भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे.
 
कामगार भरती प्रक्रियेबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी डॉक्टर शंकर निवरणकर यांना मारहाण केली आहे. २९ जुलैला ४० पदांकरीता परीक्षा झाली. ६०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
 
आश्चर्यकारकरीत्या या परिक्षेचा निकाल फक्त २ तासात लावण्यात आला  होता. या प्रकाराचा जाब शिवसेनेनं विचारला. मात्र संबंधितांकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी डॉक्टर निवरणकर यांना मारहाण केली.
 
 
 

First Published: Monday, August 6, 2012, 17:08


comments powered by Disqus