सेनेच्या उपविभागप्रमुखाकडे बनावट नोटा - Marathi News 24taas.com

सेनेच्या उपविभागप्रमुखाकडे बनावट नोटा

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत बनावट नोटा वितरीत करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. बनावट नोटाप्रकरणी शिवसेनेच्या उपविभागप्रमुख राजाराम मांगले याच्यासह चौघांना  पोलिसांनी अटक केली आहे. राजकीय व्यक्तीचा बनावट नोटा वितरीत करण्यात हात असल्याने खळबळ उडाली आहे.
 
कांजूर पोलिसांनी मांगले याच्यासह चौघांना अटक केली आहे . मुंबईतील मानखुर्द , महाराष्ट्र नगर येथे राहणाऱ्या मांगले याला शुक्रवारी अटक करण्यात आली . परंतु याप्रकरणी सखोल तपास करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासात कमालीची गोपनीयता बाळगली आहे .
 
पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी मारुती पवार हा पैसे भरायला गेला होता . त्याने बँकेत ३५ हजार रुपये भरले त्यातल्या पाचशेच्या २० नोटा बनावट असल्याचे कॅशियरच्या लक्षात आल्यानंतर त्याने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . अटक केल्यानंतर मारुती पवारने हे पैसे अप्पा रेडकर आणि राजू निकम याच्याकडून मिळाल्याचे पोलिसांना सांगितले .
 
या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे पैसे राजाराम मांगले याच्या पत्नीने दिल्याचे सांगितले . त्यानंतर पोलिसांनी मांगले  तसेच मारुती पवार , अप्पा रेडकर , राजू निकम यांना अटक केली. या चौघांना आठ ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

First Published: Wednesday, August 8, 2012, 21:37


comments powered by Disqus