रेल्वे मोटरमन पुन्हा जाणार संपावर - Marathi News 24taas.com

रेल्वे मोटरमन पुन्हा जाणार संपावर

www.24taas.com, मुंबई
 
पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने केलेल्या संपाला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा मोटरमन संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पश्‍चिम रेल्वे मोटरमन असोसिएशनने पुकारलेल्या आंदोलनाला एक महिनाही होत नाही तोच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने ९ ऑगस्ट रोजी देशभरात सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
त्यामुळे मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्य आणि पश्‍चिम रेल्वे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणार आहे. २००६ पासून प्रलंबित असलेला रोजंदारी भत्ता मिळावा, उच्च पदावरील मोटरमन यांना ४६०० ग्रेड पे मिळावा, मोटरमनच्या कामाचे तास कमी करण्यात यावेत, सहाय्यक चालक, मालगाडी चालक आणि मेल-एक्सप्रेस चालक, गार्ड यांची भरती करावी, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून होणारी पिळवणूक थांबवावी या त्यांच्या मागण्या आहेत.
 
आणि याच मागण्यांसाठी गुरुवारी देशभरात सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे युनियनचे सचिव वेणू नायर यांनी सांगितले. या आंदोलनात मध्य आणि पश्‍चिम रेल्वेतील लोकल, मेल-एक्स्प्रेस व मालगाडीचे सुमारे १५०० मोटरमन आणि गार्ड सहभागी होणार आहेत.
 
 
 

First Published: Wednesday, August 8, 2012, 22:31


comments powered by Disqus