बेस्टने घेतली प्रवाशांच्या मागणीची दखल - Marathi News 24taas.com

बेस्टने घेतली प्रवाशांच्या मागणीची दखल

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
बोरीवली पश्चिमेकडील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेत बेस्ट उपक्रमानं आपल्या 228 क्रमांकाच्या सेवामार्गात परीवर्तन केलं आहे. आता ही बेस्ट बस चारकोप, जयराज नगर, योगीनगर बोरीवली स्टेशन, भगवती रुग्णालय मार्गे रावळपाडा दहिसर पूर्व अशी धावणार आहे... स्थानिकांची मागणी लक्षात  घेत शिवसैनिकांनी या बस मार्गात बदल घडवून आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले...या कामी बोरीवली लायन्स क्लबचे अध्यक्ष रवी गुप्ता यांच्या मूळ मागणीचा पाठपुरावा ज्येष्ठ शिवसैनिक शरद पवार तसंच जी. एस. परब यांनी केला...बेस्ट अध्यक्ष सुनील शिंदे आणि व्यवस्थपनानं या मागणीची दखल घेत ही बससेवा सुरु केली.

First Published: Monday, December 19, 2011, 17:50


comments powered by Disqus