बदलापुरात शिवसेनेचे वामन म्हात्रे नगराध्यक्ष - Marathi News 24taas.com

बदलापुरात शिवसेनेचे वामन म्हात्रे नगराध्यक्ष

झी २४ तास बेव टीम, मुंबई
 
ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वामन  म्हात्रेंनी बाजी मारली आहे. अपक्ष नगरसेवक आशिष दामले उपनगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. कुळगाव-  बदलापूरमध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकली नव्हती. त्यामुळे  निवडणुकीनंतर भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होऊन नगरपालिकेत भाजपाचे राजेंद्र घोरपडे नगराध्यक्ष  तर राष्ट्रवादीचे श्रीधर पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आले. सव्वा वर्षाची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादीचा  नगरसेवक होणार असा दोन्ही पक्षांमध्ये करार झाला होता.
 
राजेंद्र घोरपडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे  शरद तेली नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. पण आज झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सेनेच्या वामन म्हात्रेंनी शरद तेलींचा अवघ्या एका मताने पराभव केला. वामन म्हात्रेंना १७ तर शरद तेलींना १६ मतं पडली. सेनेचे प्रभाकर पाटील गैरहजर राहिले तर भाजपाचे एक मत फूटल्याचं उघड झालं आहे. वामन म्हात्रेंनी मागच्या वेळेस मुरबाड विधानसभेची निवडणूक सेनेला रामराम ठोकत मनसेच्या तिकिटावर लढवली होती. त्या निवडणुकीत भाजपाचे दिगंबर विशे पराभूत झाले होते. आणि त्यानंतर नगरपालिकेच्या तोंडावर परत एकदा सेनेत प्रवेश केला होता. नगरपालिका निवडणुकीत वामन म्हात्रेंनी भाजपाच्या प्रणिता कुलकर्णी यांचा पराभव केल्याने भाजपाने नगरपालिकेत सत्ता स्थापन करताना सेनेला बाजुला ठेवत राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती.

First Published: Saturday, December 24, 2011, 09:35


comments powered by Disqus