टीम अण्णांनी आंदोलनाचं 'मैदान' मारलं - Marathi News 24taas.com

टीम अण्णांनी आंदोलनाचं 'मैदान' मारलं

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईतल्या MMRDA मैदानावर २७ ते २९  डिसेंबर पर्यंत होणार आहे. टीम अण्णांनी २६ ते ३० या कालावधीत मैदान बुक केल आहे.
 
सशक्त लोकपालसाठी अण्णांसह अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी मुंबईत उपोषण करणार आहेत. त्याचवेळी नवी दिल्लीतही अण्णांचे सहकारी उपोषण करणार आहेत.  अण्णा हजारोंच्या आंदोलन MMRDA मैदानावरच असणार आहे. अनामत रक्कम म्हणून साडेपाच लाख रुपये जमा करावे लागणार आहे. बाजारभावापेक्षा टीम अण्णांना मैदानाच्या भाड्यात जवळपास साडेतीन लाखांची सूट देण्यात आली आहे.
 
मैदानाचं भाडं
सुरुवातीला जागृती मंच द्वारे मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती मात्र जागृती मंच नोंदनीकृत नसल्याने आता पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशनच्या नावाने गे मैदान भाड्याने देण्यात आलेय.  या मैदानाच्या भाड्यापोटी टीम अण्णांना ७ लाख ७८ हजार रुपये मोजावे लागणार आहे. तर   मैदान ४० हजार स्क्वेअऱ फूटचे आहे.  त्यापैकी २० हजार स्क्वेअऱ फूट जागा आंदोलनासाठी मिळणार आहे तर १०  हजार स्क्वेअऱ फूट जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे.
 
अण्णांच्या स्टेजच्या बाजूला आराम करण्यासाठी विशेष रुम ऊभारण्यात येणार आहे. २६ तारखे पासून हे मैदान टीम अण्णांना मिळणार आहे. २६ तारखेला पेंडाल ऊभारण्यासाठी २७, २८  आणि २९ तारखेला आंदोलन आणि ३०  तारखेला पेंडाल काढणे असा पाच दिवसांसाठी हे मैदान टीम अण्णांना वापरता येणार आहे. या मैदानावर ४०  हजार आंदोलन सहभागी होऊ शकतील.
 
पोलीस बळाचा होणार वापर?
पोलिसांचा मोठा फौजपाटा आंदोलनस्थळी तैनात करण्यात येणार आहे, तर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका २४ तास आंदोलनस्थळी तैनात असणार आहे. आंदोलनासाठी आतापर्यंत ७० हजार लोकांनी नावनोंदनी केलीय.. तर अण्णांच्या जेलभरो आंदोलनासाठी ५००० लोकांनी नोंदनी केलीय.  इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना जेलमध्ये ठेवणे शक्य नसल्याने आंदोलकांना अटक करुन पोलिस ठाण्यात नाव नोंदवून लागलीचट सोडून देण्यात येणार आहे.
 
अण्णा आजारी
जनलोकपालसाठी पुन्हा आंदोलनासाठी तयार झालेल्या अण्णा हजारेंना खोकला झालाय. थंडी आणि वातावरणातल्या बदलांमुळं अण्णांना खोकला झाल्याचं सांगण्यात य़ेतयं. अण्णांना खोकल्यावर औषध देण्यात आलयं. आंदोलनापर्यंत अण्णांचा खोकला ठीक होईल, असा दावा अण्णांच्या राळेगणसिद्धीतल्या सहका-यांनी केलाय.
 

First Published: Saturday, December 24, 2011, 14:26


comments powered by Disqus