ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं निधन - Marathi News 24taas.com

ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं निधन

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं आज निधन झालं. त्यांचा मुंबईतल्या राहत्या घरी सत्यदेव दुबे याचं निधन झालं, १९३६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी मराठी रंगभूमीसाठी भरीव कामगिरी केली होती.
 
त्यांच्या निधनामुळे  प्रायोगिक रंगभूमीचा श्र्वास हरपला आहे, त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं,  त्यांना १९७१ ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. तर पद्म भूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.
 
सत्यदेव दुबे यांनी प्रायोगिक रंगभूमीवर मोठं योगदान दिलं होतं. इब्राहिम अल्काझी यांच्याकडे त्यांनी नाटकाचे धडे गिरवले होते. विजय तेंडुलकर, महेश एचकुंचवार श्माम मनोहर, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली होती. कुसुमाग्रजांवर आधारित आयुष्यात पहिल्यांदाच हा आगळावेगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. आधे अधुरे, अबे बेवकूफ, संभोग से समाधी तक, अंधायुग, एज्युकेटिंग रिटा, हयवदन, डॉन जॉन इन हेल अशी अनेक नाटकं त्यांनी केली होती. अंकुर सिनेमाची पटकथा त्यांनी लिहली होती, तर साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे नाट्यभूमीचं मात्र कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे.

First Published: Sunday, December 25, 2011, 14:54


comments powered by Disqus