ओशिवारा परिसरात महिलेची छेडछाड - Marathi News 24taas.com

ओशिवारा परिसरात महिलेची छेडछाड

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत ओशिवारा परिसरात फिल्म प्रोड्युसर स्वराजसिंग वर्मा आणि त्याची एक महिला सहकारी हॉटेलमधून बाहेर पडत असताना दोन गुंडांनी या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या दोघांना रस्त्यातच अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
 
यात स्वराज सिंग वर्मावर चाकूचा वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी रिव्हॉल्वर काढून हवेत गोळीबार केला. रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार करताच हे दोन्ही गुंड तिथून फरार झाले.
 
स्वराज यांनी आतापर्यंत काही बी-ग्रेड सिनेमांची निर्मिती केलीये. मात्र या दोघांवर असा अचानक हल्ला का करण्यात आला, आणि हल्लेखोर नेमके कोण होते, याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही
 

First Published: Monday, December 26, 2011, 10:24


comments powered by Disqus