... तर गोळ्या घालीन - बाळासाहेब ठाकरे - Marathi News 24taas.com

... तर गोळ्या घालीन - बाळासाहेब ठाकरे

झी 24 तास वेब टीम, मुंबई
 

‘मुंबई हीच महाराष्ट्राची राजधानी आहे. आर्थिक बिर्थिक मला माहिती नाही.’ ‘मुंबई कोणी महाराष्ट्रापासून तोडू पाहत असल्यास मी स्वतः बंदूक घेऊन गोळ्या घालीन’, असा सज्जड दम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐतिहासिक दसरा मेळाव्यात भरला.  ‘आजही संपूर्ण महाराष्ट्राभर दौरा काढू शकतो, थोडा दम लागतो इतकचं. बाकी मी अजूनही ठणठणीत असल्याचं त्यांनी यावेळी सांगून डरकाळी फोडली.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या विचाराचे सोनं लुटण्यासाठी लाखो शिवसैनिकांचा महापूर आज शिवाजी पार्कावर लोटला होता. जवळजवळ वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर बाळासाहेबांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी शिवाजी पार्कची वाट धरली होती. बाळासाहेबांचे आगमन होताच घोषणांनी संपूर्ण शिवाजी पार्क दणाणून गेला, धीरगंभीर पण ठाकरी शैलीतच बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. या संपूर्ण भाषणात बाळासाहेबांनी अनेक टिचक्या व टपल्या मारल्या.
 

काँग्रेस सरकारवर टीकेचा भडीमार 
 
शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आजच्या भाषणात टीकेची झोड उठवली. देशाच्या संरक्षणमंत्र्याला स्वतःचे संरक्षण करता येत नाही ते देशाचे संरक्षण कसं करु शकतील? अशा शब्दांत केंद्रीय मंत्र्याच्या कारभाराचा पंचनामा केला. पण राज ठाकरे यांचा विषय सोयीस्कररित्या टाळण्यात आला. याच वेळी चीनच्या कुटीलनितीचाही समाचार घेतला.
 
वरळी सी-लिकं राजीव गांधीचा नावला विरोध
नानासाहेब शंकरशेठ यांनी मुंबई घडवली असताना राजीव गांधी यांचे नाव सेतूला कशासाठीदेता असा सवाल करताना शिवसेनाप्रमुखानी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचाही समाचार घेतला. त्याचवेळी समुद्रात भर टाकणा-या आणि गिरणी कामगाराना संपवणा-या काँग्रेससरकारला मत देवू नका असे आवाहन केले.
 
अफजलगुरू काय सोनियांचा जावई आहे का?
साऱ्यांना फक्त मुंबईचेच खड्डे दिसतात या शब्दात शिवसेनेची बाजू घेतानाच काँग्रेसचा समाचार घेणे सुरुचं होते. अफजलगुरू सरकारचा जावई आहे का असा सवाल करत, मी राष्ट्रपती असतो तर ओमर अब्दुलाला तुरुंगात टाकले असते अशी टीकाही केली. कसाबचे लाड बंद करा, याशब्दात फटकारत त्यांनी प्रशासनाची लक्तर वेशीवर टांगली.
 

रिक्षाचालकांच्या संपावर सडकून टीका
 
शिवसेनाप्रमुखांनी आज शिवाजी पार्कवर बोलायला सुरुवात केली तेव्हा शिवसैनिकांमध्ये चैतन्यफुंकले गेले. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रिक्षावाल्याच्या संपावर सडकून टीका केली. त्याचवेळी खरा मुंबईकर असलेल्या गिरणी कामगाराची सरकारने अक्षरश चेष्टा केली आहे, असं सांगत सरकारला टार्गेट केलं.


 

First Published: Friday, October 7, 2011, 11:15


comments powered by Disqus