Last Updated: Friday, October 7, 2011, 08:31
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरोधात गुन्हा
झी २४ तास वेब टीम, मुंबईशिवाजी पार्क पोलिसांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरोधात ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.
ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळण्याच्या अटीवर मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली होती. दसरा मेळाव्यामध्ये ५० डेसिबल आवाजाची मर्यादा असताना हा आवाज ८० डेसिबलपर्यंत पोहचल्याचा ठपका आयोजकांवर ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा गुन्हा शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेचे मिलिंद वैद्य, दिवाकर बोरकर आणि अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First Published: Friday, October 7, 2011, 08:31