Last Updated: Tuesday, December 27, 2011, 21:49
झी २४ तास वेब टीम, मुंबईभ्रष्टाचाराविरोधात सशक्त लोकपालासाठी एल्गार पुकारलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रकृती आज पुन्हा खालावली असून त्यांना सायंकाळीनंतर ताप पुन्हा ताप आला आहे.
त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आज सायंकाळी त्यांच्या प्रकृती तपासली त्यावेळी त्यांना १०२ ताप असल्याचे लक्षात आले. दरम्यान अण्णांना ताप जरी असला तरी त्यांचे ब्लडप्रेशर सामान्य आहे. सध्या त्यांचे ब्लडप्रेशर १७०/९६ असून थोडा सर्दी-खोकला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अण्णा उपाशी असून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, असे त्यांच्यावर प्रकृती तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
अण्णांनी अशा तापाच्या स्थितीत उपोषण करून नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्यांनी डॉक्टरांचा सल्ला झुगारून उपोषणाला बसले आहेत. अण्णांचा ताप वाढल्यानंतर टीम अण्णाने त्यांना उपोषण सोडण्याचा आग्रह केला. परंतु, अण्णा आपल्या निर्णयावर ठाम राहून उपोषण कायम ठेवले आहे.
First Published: Tuesday, December 27, 2011, 21:49