बोन मॅरो जागृतीचं 'रॉकिंग' अभियान - Marathi News 24taas.com

बोन मॅरो जागृतीचं 'रॉकिंग' अभियान

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत बांद्र्याच्या एमपी थियेटरमध्ये बोन मॅरो उपचाराबाबत बाबत जागरूकता अभियान सुरु आहे. एमडीआरआय नावाच्या संस्थेनं नागरीकांमध्ये याबाबत जागरूकता यावी यासाठी हा उपक्रम सुरु आहे.
 
बोन मॅरो सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महत्वाचे आहे, याद्वारे थॅलिसिमीया आणि ब्लड कँन्सर सारख्या रोगांवरही उपचार शक्य असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. या कार्यक्रमात बोन मॅरोसाठी नोंदणी कशी करायची याचीही माहिती देण्यात आलीये.
 
भारतात आतापर्यंत ८ हजार लोकांनी यासाठी नोंदणी केलीय. जास्तीत जास्त लोकांनी यासाठी नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केलय..
 

 
 

First Published: Thursday, December 29, 2011, 09:20


comments powered by Disqus