पालिकेची हायटेक सिस्टम 'खड्डयात' ! - Marathi News 24taas.com

पालिकेची हायटेक सिस्टम 'खड्डयात' !

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेने मोबाईल ट्रेंसिग सिस्टिम वेबसाईट सुरू केली होती. पालिकेच्या वेबसाईटवर  मुंबईकराच्या तक्रारी आल्या. मात्र एकही खड्डा बुजवला नसल्याच उघड झालंय. पालिकेची  या मोबाईल ट्रेंसिग सिस्टिममुळे सत्ताधारी शिवसेना-भाजप युती अडचणीत आली आहे.
 
पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर नेहमीच खड्डे पडतात.हे खड्डे २४ तासात त्वरीत बुजवले का ?  हे पाहण्यासाठी मुंबई महापालिकेन GPRS मोबाईल मोबाईल ट्रेंसिग सिस्टिम निर्माण केली होती. या मोबाईल ट्रेंसिगद्वारे मुंबईकरानी मोबाईलवर रस्तावरील खड्ड्याचे फोटो काढून पालिकेच्या वेबसाईटवर पाठवले, तर त्वरीत खड्डे बुजवले जातील असा पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीन दावा केला होता. मात्र पालिकेच्या वेबसाईटवर ५४ तक्रारी आल्यात त्यातील एकही खड्डा पालिकेन आत्तापर्यन्त बुजवला नसल्याचं उघड झालंय.
 
 
ही मोबाईल ट्रेंसिग सिस्टिम धुळफेक करणारी आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे. प्रसारमाध्यमांनी पालिका प्रशासनाच्या हे लक्षात आणाता पालिकेने हे खड्डे त्वरीत बुजवले जातील अस स्पष्टीकरण दिलंय. मोबाईल ट्रेंसिग सिस्टिम बेबसाईटसाठी २० लाख रुपयांचा खर्च पालिकेने केलाय.तर खड्डे बुजवण्यासाठी ६४ कोटी खर्च झाले आहेत. खड्डे तर तसेच आहेत मग पैसे कुठे असा सवाल आता विरोधक करत आहेत.
 

 
 

First Published: Thursday, December 29, 2011, 10:01


comments powered by Disqus