बोरीवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News 24taas.com

बोरीवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत बोरीवलीला निशांत बारवर पोलिसांनी छापा मारुन तिथल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
 
या छाप्यात २४  मुलींसह कॅशियर आणि मॅनेजरला अटक केलीय. या छाप्यात पोलिसांनी ४ लाख रुपयांची रोकडही जप्त केलीय. विशेष म्हणजे या निशांत बारचं लायसन्स समर बारच्या नावानं असल्याचंही तपासात उघड झालंय. दुसऱ्याच्यानावाने आणखी काही बार सुरू आहेत का, याची चौकशी आता पोलिसांना करावी लागेल. मात्र, काही पोलिसांचा बार चालकांना आशीर्वाद  असल्याने असे धंदे सुरू राहतात, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
 
छापा पडल्यावर मुलींना बाजूच्या एका किराणा दुकानात लपवलं जात असल्याचं उघड झालय. मुलींना पळून जाण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळं आता बियर बारही अवैध व्यवसायाचे अड्डे बनलेत काय, अशी शंका उपस्थित करण्यात. याआधी वसई, नवी मुंबईत आणि मुंबईत कारवाई करण्यात आली होती.
 

First Published: Friday, December 30, 2011, 09:44


comments powered by Disqus