श्री. शरद पवार - गेस्ट एडिटर, झी २४ तास - Marathi News 24taas.com

श्री. शरद पवार - गेस्ट एडिटर, झी २४ तास


झी २४ तास वेब टीम, न्यूजरूम (मुंबई)
 
केंद्रीय कृषी मंत्री श्री. शरद पवार यांचे झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. शरद पवार यांच्या भेटीने न्यूजरूममध्ये वेगळाच उत्साह संचारला. आज शरद पवार यांच्या मार्गदर्शानाखाली झी २४ तासच्या बातम्यांचा प्रवास सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ नेते, दिल्लीत आपल्या राजकारणाने छाप पाडणारे, क्रिकेटच्या राजकारणातील सर्वोच्च पद साभांळणारे  असे शरद पवार हे आज झी २४ तासच्या गेस्ट एडिटर पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून झी २४ तासच्या बातम्यांचा प्रवास आपणास पाहता येईल.
 

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संपादक मंदार परब यांच्या केबिन बाहेर एकच गर्दी उसळली आणि फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरु झाली. शरद पवार  हे आता थोड्याच वेळात झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देणार आहेत आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसचं शरद पवार यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.

गेस्ट एडिटर म्हणून येथील चालणारे कामकाज ते आज समजून घेणार आहेत. त्यानंतर दिवसभरातील एकूणच बातम्या कोणत्या पद्धतीने जाणार याचा आढावा देखील गेस्ट एडिटर शरद पवार घेणार आहेत. यानंतर ते येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

First Published: Friday, December 30, 2011, 23:54


comments powered by Disqus