Last Updated: Tuesday, October 11, 2011, 11:27
झी २४ तास वेब टीम, मुंबईराज्यभरातले 12 हजार सरकारी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या सेवांवर परिणाम झाला आहे. सहावा वेतन आयोग 2006 पासून लागू करण्याची या डॉक्टरांची मागणी आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेनं हा संप पुकारलाय़. वैद्यकीय शिक्षण विभागात ज्याप्रमाणं खाजगी व्यवसाय न करण्याचा भत्ता म्हणजे नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स दिला जातो त्याप्रमाणं दिला जावा अशी मागणीही डॉक्टरांनी केली.
वेळेवेळी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांकडे या मागण्या करुनही त्याची दखल न घेतल्यामुळं आंदोलनाचं हत्यार उपसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. डॉक्टरांच्या संपामुळं ग्रामीण भागातल्या रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, October 11, 2011, 11:27