६० वर्षाच्या महिलेची सी-लिंकजवळ हत्या - Marathi News 24taas.com

६० वर्षाच्या महिलेची सी-लिंकजवळ हत्या

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबईत न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आलेल्या एका साठ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेचा आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे न्यू इयरला गालबोट लागंल आहे.
 
मुंबईतल्या वरळी सी-लिंकजवळ एका साठ वर्षाच्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. वरळी सी लिंकजवळच्या खडकांमध्ये हा मृतदेह सापडल्याचं सांगण्यात येत आहे.
 
पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना हा मृतदेह आढळला. मृत महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. न्यू इय़र सेलिब्रेशन करण्यासाठी ही महिला आली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्याच्या दिशेनं तपास सुरु केला आहे.

First Published: Sunday, January 1, 2012, 17:50


comments powered by Disqus