सेनाभवनात उद्धव ठाकरेंची आज बैठक - Marathi News 24taas.com

सेनाभवनात उद्धव ठाकरेंची आज बैठक

www.24taas.com, मुंबई
 
निवडणूकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांचा अजेंडा तयार होऊ लागला आहे. शिवसेनेने आज जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. बैठकीत पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईत सेनाभवनावर ही बैठक होणार आहे.
 
काल निवडणुकिच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकिय पक्षांची चक्र वेगाने फिरू लागली आहेत. निवडणुकिला जवळ जवळ महिनाच उरल्यानं आता निवडणुकिसाठी प्रत्येक पक्षांने कंबर कसली आहे.
 
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती या बैठकीत आखण्यात येईल. निवडणूक आयोगानं काल मतदानाच्या तारखा जाहीर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचं नियोजन केलं जातं आहे. शिवसेनेनं आज सेनाभवनावर पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना पाचारण केलं आहे.

First Published: Wednesday, January 4, 2012, 13:48


comments powered by Disqus