स्कॉर्पिओ गाडीनं ७ जणांना चिरडलं - Marathi News 24taas.com

स्कॉर्पिओ गाडीनं ७ जणांना चिरडलं

झी २४ तास वेब टीम, वसई
 
वसईमध्ये भरधाव वेगात जाणा-या स्कॉर्पिओ गाडीनं ७ जणांना चिरडलयं. यात चौघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत.
 
 
मृतांमध्ये स्कॉर्पिओचा ड्रायव्हरही ठार झालाय. अमेय दळवी असं त्याचं नाव आहे. वसईच्या पापडी परिसरात रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडलीए. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रात्री दीडच्या सुमारास भरघाव वेगानं आलेल्या स्कॉर्पिओनं सुरुवातीला विद्युत खांबाला धडक दिली. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा आणि मोटरसायकलला धडक दिली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या चार जणांना स्कॉर्पिओनं चिरडलं.
 
या अपघातात स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरसह अभिजीत साळवी, अमित तांबे आणि अन्य एकाचा मृत्यू झालाय. जखमींमध्ये रिक्षा ड्रायव्हरचाही समावेश असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये. जखमींना कार्डिनल ग्रेसेफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

First Published: Friday, October 21, 2011, 06:35


comments powered by Disqus