चीनमध्ये शिक्षा, हिरे व्यापारी मुंबईत - Marathi News 24taas.com

चीनमध्ये शिक्षा, हिरे व्यापारी मुंबईत

www.24taas.com , मुंबई
 
तस्करीच्या आरोपावरून  चीनमध्ये गेले दोन वर्षे शिक्षा भोगत असलेले १२ भारतीय हिरे व्यापाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. या हिरे व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री उशिरा भारतात आगमन झाले. त्यांचे मुंबई विमातळावर स्वागत करण्यात आले.
 
 
तस्करीच्या आरोपावरून १२ भारतीय हिरे व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली होती. सहा महिन्यापूर्वीच न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. गुरुवारी रात्री उशिरा ते मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी जल्लोष केला. मात्र, आजही नऊ व्यापारी चीनमध्ये शिक्षा भोगत आहेत.
 
गेली दोन वर्ष आमच्यासाठी खूपच वाईट गेले. खूप दुःख पचवत आम्ही हे दिवस काढले. कोणत्याही व्यक्तीवर असे दिवस येऊ नयेत. कारागृहात असताना आम्हाला शाकाहारी जेवण मिळत होते. तीन महिन्यांनी नातेवाईकांची भेट घडवली जात होती. मात्र, कोणीही या वाटेने जाऊ नये, असे एका व्यापाऱयाने सांगितले.

First Published: Friday, January 6, 2012, 12:11


comments powered by Disqus