Last Updated: Sunday, January 8, 2012, 15:24
www.24taas.com, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आता आघाडी करण्याबाबत आक्रमक झाली आहे. आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीनं काँग्रेसला आता अल्टिमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत घ्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला दिला.
गुरुदास कामत-कृपाशंकर सिंह गटातल्या या सुंदोपसुंदीमुळं काँग्रेसनं आघाडीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. उलट जिल्हाध्यक्षांची मतं जाणून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळं आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. आता त्यातच पवारांनी इशारा दिल्यानं आघाडीचं काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसनं आम्हाला शेवटपर्यंत लटकवत ठेऊ नये त्यामुळं कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा आदेशच पवार यांनी दिला.
First Published: Sunday, January 8, 2012, 15:24