राष्ट्रवादीचा 'टाईम' गेम.. काँग्रेसचा 'माईंड' गेम - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीचा 'टाईम' गेम.. काँग्रेसचा 'माईंड' गेम

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत आघा़डी करायची की नाही यावरून बरंच राजकारण सुरू आहे, आघाडी करावी की न करावी यावर बरेच मतभेद असल्याने याविषयावर बराच वेळ आज बैठक सुरू होती. पण तरीही काही तोडगा निघाला नसल्याचे समजते, आता उद्या संध्याकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनासोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे. काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी ही माहिती दिली. तसचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डेडलाईन दिल्याने काँग्रेस चांगलचं अडचणीत आल्याचे दिसते.
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आघाडीबाबत काहीच ठरताना दिसत नाहीये. त्यामुळे गेले अनेक दिवस बैठकींच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे बैठकीत आजच्या बैठकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आघाडीबाबतच्या चर्चांचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. काँग्रेस नेत्यांची सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक सुरू होती. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही याबाबत चर्चा होते होती.
 
राष्ट्रवादी काँग्रेस आता आघाडी करण्याबाबत आक्रमक झाली आहे. आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीनं काँग्रेसला आता अल्टिमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत घ्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला दिला.

First Published: Sunday, January 8, 2012, 19:57


comments powered by Disqus