बॉलिवूड पार्टीचा थाट, स्थानिकांच्या मनशांतीची वाट - Marathi News 24taas.com

बॉलिवूड पार्टीचा थाट, स्थानिकांच्या मनशांतीची वाट

www.24taas.com, मुंबई 
 
बॉलीवूडच्या एखाद्या दिग्गजाचा वाढदिवस सामान्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरते याचा प्रत्यय पुन्हा रात्री आला.. निमित्त होतं चित्रपट निर्माता दिग्दर्शक आणि  अभिनेता फरहान अख्तर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं... बांद्र्याच्या फरहानच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती.
 
 
बॉलीवूडच्या अनेक तारे तारकांनी या पार्टीला हजेरी लावली होती. किंग खान शाहरुख खान पासून ते हृतिक रोशन, कतरिना कैफ, प्रियांका चोपडा, रणदीप हुडा यांच्य़ासह अनेक मान्यवरांनी या पार्टीला येत फरहानला शुभेच्छा दिल्या. मात्र ही पार्टी रात्री उशिरा पर्यंत म्हणजे अडीच वाजेपर्यंत चालली तरी पोलिसांनी या पार्टीचा बेरंग केला नाही.. मीडियाला पाहून मात्र थोडीफार हालचाल करत डीजे बंद करायला लावला मात्र कोणताही दंड आकारला नाही. या पार्टीसाठी मीडियाप्रमाणेच बॉलीवूड चाहत्यांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. मात्र या गर्दीचा आणि आवाजाचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागला...

 
 
 
 
 

First Published: Monday, January 9, 2012, 08:54


comments powered by Disqus