शेवाळेंमुळे भाजप कार्यकर्ते खवळले - Marathi News 24taas.com

शेवाळेंमुळे भाजप कार्यकर्ते खवळले

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई चेंबूर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवला. या भागातला वॉर्ड क्रमांक १३४, शिवसेनेला सोडण्यात आल्याने  संतप्त होऊन कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला.  या वॉर्डातून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडणूक लढवणार आहेत.
 
राहुल शेवाळेंचा वॉर्ड राखीव झाल्यानं, ते या वॉर्डातून निवडणूक लढवत आहेत. २००७  साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारानं इथून निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. इतकंच नव्हे तर भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता. काँग्रेसच्या उमेदवार निर्मलादेवी सिंह २७७५ मतं मिळवून विजयी झाल्या होत्या.
 
तर भाजपच्या शशिबाला टाकसाळ यांना १४४३ मतं मिळाली होती. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवारानं सर्वाधिक २६३४ इतकी मतं मिळवली होती.

First Published: Monday, January 9, 2012, 19:24


comments powered by Disqus