मनसेची मुलाखत प्रकिया पूर्ण - Marathi News 24taas.com

मनसेची मुलाखत प्रकिया पूर्ण

www.24taas.com, मुंबई
 
मनसे मुंबईत सगळ्या जागा लढवणार आहे,  म्हणजे २२७ जागा लढवणार आहे. मनसेची मुंबईतली उमेदवार निवडीसाठीची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रात्री नाशिकला रवाना होणार आहेत.
 
दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान पुणे आणि नाशिकमध्ये उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. तर ठाण्यामध्ये १७ आणि १८ जानेवारीला मुलाखती होतील. २० तारखेनंतर मनसेची पहिली यादी अपेक्षित आहे.
 
मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची परीक्षा झाली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच मनसेची उमेदवार निवड प्रक्रिया उत्सुकतेची ठरली होती. आधी लेखी परीक्षा, मग मुलाखत आणि त्यानंतर राज ठाकरे उमेदवार निश्चित करणार आहेत.  

First Published: Monday, January 9, 2012, 21:28


comments powered by Disqus