Last Updated: Tuesday, January 10, 2012, 00:20
www.24taas.com, मुंबई 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं व्यंगचित्र रेखाटल्याने राजकिय चर्चेला चागंलच उधाण आलं आहे. राज यांना बाळासाहेबांचे व्यंगचित्र काढायल्या सांगितल्यानंतर मात्र राज ठाकरे चांगलेच भावुक झाले, व त्यांनी आपली खंत बोलून दाखववली गेले अनेक दिवस बाळासाहेूबांना पाहिले नाही. त्याचं व्यगंचित्र काढताना आता दाढी वाढली कि कमी झाली असा प्रश्नच राज यांना पडला होता.
राज ठाकरे पार्ले कट्ट्यावरच्या मुलाखतीत जोरदार फटकेबाजी करत व्यंगचित्रांपासून ते राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. आत्मविश्वासाच्या जोरावरच राजकारणात वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आताच जागं झालं नाही तर येत्या काही वर्षांत महाराष्ट्रांचा क्रमांक घसरेल असा इशारा त्यांनी दिला. कर्नाटक विषयावर त्यांनी पुन्हा ठणकावलं.
या कार्यक्रमात राज यांना व्यंगचित्र काढण्याची विनंती करण्यात आली होती. राज यांनी चक्क खुद्द बाळासाहेब यांचं व्यंगचित्र काढल्याने. पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
First Published: Tuesday, January 10, 2012, 00:20