Last Updated: Wednesday, January 11, 2012, 08:52
www.24taas.com, मुंबई 
काल आघाडीचा मेळ बसला. मात्र महायुतीमध्ये अजुनही धुसफूस ही सुरूच आहे. दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांनी मुंबईत पाच जागांची मागणी केल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मनधरणीसाठी रिपाइं नेते रामदास आठवले प्रयत्न करत आहे
महायुतीच्या बैठकीत मानापमान नाट्य रंगल्यानंतर रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून दलित पँथरचे नामदेव ढसाळ यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी मंगळवारी रात्री दोन्ही नेत्यांची भेट झाली.
या भेटीत ढसाळ यांनी दलित पँथरसाठी मुंबईत पाच जागांची मागणी केली. मुंबईतल्या रमाबाई नगर, चेंबूर, माटुंगा, कफ परेड आणि कांदिवली या जागांची मागणी त्यांनी आठवले यांच्याकडे केली आहे. याशिवाय नागपुरात सहा ते सात, सोलापूर, पुण्यात प्रत्येकी पाच, नाशकात चार, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि ठाण्यात एका जागेची मागणी ढसाळांनी केली आहे.
First Published: Wednesday, January 11, 2012, 08:52