Last Updated: Wednesday, January 11, 2012, 15:08
www.24taas.com, मुंबई 
मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील अपघातात २०११ साली १६० लोक मृत्यूमुखी पडली तर १७३ जण जखमी झाल्याचं रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बागुल यांनी सांगितलं की २००६ सालापासून डोंबिवलीच्या रेल्वे मार्गावरील अपघातांमध्ये ९६६ जणांचा मृत्यू झाला.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे मार्गावर २००२ ते २०११ दरम्यान विविध अपघातांमध्ये ३६,१५२ जण मृत्यूमुखी पडले तर ३६,६८८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
चेतन कोठारी यांनी रेल्वे पोलिसांकडे माहितीच्या अधिकाराखाली पाठपुरावा करुन ही माहिती मिळवली.
दोनच दिवसांपूर्वी डोंबिवली जवळच दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचाही मृत्यू गाडीखाली सापडल्याने झाला होता.
First Published: Wednesday, January 11, 2012, 15:08